न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी सुशांत यांनी आरोपींना पाणी दिले नाही. यावरून आरोपींनी सुशांत यांना वीट फेकून मारली. यामध्ये सुशांत यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.
ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास पंचरत्न कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली. सुशांत शिवाजी पाटील (वय २४, रा. पंचरत्न कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, उमेश गणेश ढावरे (वय २४), सोनू गायकवाड (वय २५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.















