न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०१९) :- महापालिकेच्या ‘ इ ‘ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. ३ वडमुखवाडी येथील रेड झोन बाधित क्षेत्रामध्ये नव्याने सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर (दि. ३०) रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये एकूण ५ अनधिकृत बांधकामे ( रेड झोन बाधित ) आर. सी. सी. (तळमजला) असे एकुण क्षेत्रफळ अंदाजे ३५६५.०० चौ. फुट पाडण्यात आली आहेत.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सह शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण पथक, पोलिस पुरुष ७६ पोलिस महिला ०२, पोकलेन (ब्रेकर) ०१, मनपा कर्मचारी यांचे उपस्थितीत निष्कासनाची कारवाई करण्यात आली, असे महापालिकेच्या ई व फ क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















