न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जानेवारी २०१९) :- पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. संचालकपदी शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका यांची नुकतीच नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांचे हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये सभासद, पुणे महानगरपालिका हे पदसिद्ध संचालक आहेत. सिद्धार्थ शिरोळे, आमदार हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले असल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर शंकर गणपत पवार यांची कंपनी कायदा २०१३ मधील तरतुदीनुसार पुणे महानगर परिवहन मंहामंडळ लि. पुणे च्या संचालक मंडळावर संचालकपदी नियुक्ती करणेत आल्याने त्यांचा सत्कार समारंभ महापौर कक्षात आयोजित करण्यात आला होता.















