न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जानेवारी २०१९) :- पिंपरी – चिंचवड शहर भाजप अध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर आमदार महेश लांडगे यांची भाजपा शहराध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने आमदार जगताप यांनाच संधी देणार की नवीन सदस्यांचा विचार करणार याबाबत गेल्या तीन महिन्यापासून चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील काही शहरांचे अध्यक्ष निवडले गेले. मात्र, पिंपरी – चिंचवडची निवड झाली नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शहरातील सहा गटातील सुमारे बाराशे बूथ कमिठ्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर यामधूनच अध्यक्ष निवड करण्यात येतो.
आमदार जगताप यांनी शहराध्यक्षपद भूषविल्याने ते हे पद पुन्हा घेण्यास अनुत्सुक असल्याचे बोलले जात आहे. लांडगे यांनी शहराध्यक्षपद भूषवावे यासाठी पक्ष आग्रही आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. येत्या दोन दिवसात अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.


















