- क्रीडा धोरणावरही होतोय प्रतिकुल परीणाम – छाया सोळंके-जगदाळे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- महापालिकेतील निर्लज्ज लोकप्रतिनिधी व क्रीडा समितीमुळे शहरातील क्रीडा धोरण व क्रीडा कार्यालयाचा खेळखंडोबा लावला असून, ही वृत्ती शहरातील खेळाडूच्या भविष्यासाठी मोठी अडथळ्याची शर्यत बनली आहे. आशिया खंडात शेखी मिरवणाऱ्या महापालिकेला क्रीडा विभागासाठी कायम स्वरुपाचे कार्यालय उपलब्ध करुन देता येत नाही. मागील दोन वर्षात क्रीडा विभागाचे कार्यालय तीन ठिकाणी हालवण्यात आले. याचा परिणाम शहरातील क्रीडा घटकावर व विशेषत: खेळाडूवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सर्व परिस्थितीला महापालिकेचे लोकप्रतिनिधी व क्रीडा समिती जबाबदार असल्याचाही आरोप मराठी एकीकरण व विकास आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी केला असून, क्रीडा विभागाच्या कार्यालयासाठी हक्काची कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी देखील आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्रीडा विभाग व त्यासाठी स्वतंत्र क्रीडा समिती अस्तित्वात आहे. शहरामध्ये खेळांचे विवीध मैदान व त्यासबंधीच्या सुखसोयी आहेत. महापालिका या सुखसोयीवर वर्षभरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करते. याध्ये व्यायामशाळा, बॅडमेंटन हॉल, जलतरण तलाव, रायफल शुटींग हॉल, हॉकी मैदानस फुटबॉल मैदान, यासारख्या इतरही मैदानाचा समावेश आहे. त्या बरोबरच क्रीडा शिष्यवृत्ती, खेळाडू दत्तक योजना, महापौर चषक, वेळोवेळी अनेक क्रीडा स्पर्धा यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या सर्व खर्चाच व सोयीचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे शहरात चांगले गुणवत्ता धारक व उत्कुष्ट खेळाडू घडले पाहिजे. या सर्वांची जबाबदारी ही क्रीडा विभागाच्या आंतर्गत कार्यालयाकडून पेलली जाते. पण याच क्रीडा विभागाच्या कार्यालयाचा खेळखंडोबा सध्या महापालिकेकडून सुरु आहे.
सुरवातीला नेहरुनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडीयम मध्ये कार्यांन्वीत असलेले हे कार्यालय मगर स्टेडीयमच्या नुतणीकरणामुळे मासुळकर कॉलनी येथील महापालिकेच्य तंत्र निकेतन शाळेमध्ये हालविण्यात आले होते. पण ती इमारतही एका वरिष्ठ राजकारण्याच्या सांगण्यावरुन एका शाळेला नाममात्र भाड्याच्या स्वरुपात वापरण्यास दिल्यामुळे पुन्हा तेथील क्रीडा कार्यालय पिंपरी चौकातील क्रांतीसुर्य महात्मा फुले पुतळ्यामागील पालिकेच्याच इमारती मध्ये हलविण्यात आले. आता पुन्हा ती इमारत दुसऱ्या कामासाठी वापरण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे पुन्हा क्रीडा विभागाच्या कार्यालयासाठी जागा शोधण्याची वेळ आली आहे.
शहरात क्रीडा सुख-सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. याचा वापर करुन राज्य, देशपातळी नाहीतर जागतीक पातळीचे देखील खेळाडू शहरात घडले पाहिजे. यासाठी क्रीडा समिती महापालिका प्रशासन यांच्या बरोबरच क्रीडा विभागाची देखील जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी क्रीडा विभागाला स्वतंत्र व अदयावत कार्यालय आवश्यक आहे. पण सध्या या विभागाकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे सध्याच्या परस्थितीवरुन दिसून येत आहे लोकप्रतिनिधी मात्र स्वतःच्या वाढदिवसा निमीत्त स्वताची चमकेगीरी करण्यापुरतेच क्रीडा विभागाशी सबंध ठेवतात. तर क्रीडा समिती आम्हांला आर्थिक अधिकारच काय आहेत यावरुनच या विभागाचे महत्व ठरवत आहे. पण कुणालाही खेळाडूविषयी सामाजीक भावणा ठेवून त्यांच्या उपयोगी कामे ही वेळेत होण्यासाठी क्रीडा विभागाचे कार्यलय स्थिर असणे महत्वाचे आहे हे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामापेक्षा कार्यालय स्थलांतराचाच जास्त धसका घेतल्याचे दिसत आहे. पण या सर्व प्रकारामुळे शहरातील खेळाडूंचे आतोनात नुकसान होत असून, या परस्थितीला सर्वस्वी महापालिका प्रशासन व कार्यशुन्य लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.
– छाया सोळंके-जगदाळे, प्रदेश अध्यक्षा मराठी एकीकरण व विकास आघाडी.















