न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- रहाटणीतील तापकीरनगर परिसरात आज गुरुवारी (दि. २) रोजी दुपारी चार वाजेपासून वीज गायब आहे. महावितरण कार्यालयाशी संपर्क केला असता, दोन तासात, अर्धा तासात लाईट येईल, अशी उत्तरं मिळत आहेत.
तापकीरनगर परिसरात आज महापालिकेच्या दिवसाआड पाणी पुरवठ्याचा वार आहे. पाणी येऊनही नागरिकांना पाणी भरता येईना, रात्रीचे ९ वाजले तरी विजेचा पत्ता नाही. स्वयंपाक कसा करायचा? असा सवाल परिसरातील महिलावर्ग उपस्थित करीत आहेत.
याबाबत थेरगाव येथील महावितरणाच्या कार्यालयाशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, तापकीरनगरमधील तुळजा भवानी मंदिर परिसरातील झोपडपट्टी भागात महापालिकेच्या रस्त्याच्या व अमृत योजनेच्या कामामुळे तेथील जेसीबीने खोदकाम करीत असताना विजेची केबल तोडली आहे. त्यामुळे विजेची समस्या उदभवली आहे. वीज पुरवठा पूर्वरत होण्यासाठी साधारण अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळही लागू शकतो. परिसरातील नागरिक व महिला वर्ग मेटाकुटिला आला असून, लवकरात लवकर विजेचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.


















