न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०१९) :- शिवीगाळ व मारहाण करून सासरच्या मंडळींनी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच अनैसर्गिक अत्याचार करून पतीने लैंगिक छळ केला.
चिखली येथे एप्रिल ते २७ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी २१ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद, भाचा आणि अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, आरोपीनी संगनमत करून फिर्यादी महिलेला वेळोवेळी शिवीगाळ करत हाताने मारहाण करून वाईट वागणूक दिली. तसेच फियादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने फिर्यादी यांच्यावर अनैसर्गिक लेंगिक अत्याचार केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.















