न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०१९) :- मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असे सांगून चारचाकी वाहन घेतले. मात्र, ती चारचाकी परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद केली. भोसरी येथे (दि. १७ नोव्हेंबर २०१९) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुधाकर पुडालक पोळकर (वय ४०, रा. चिखली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर माने (वय ३५) व गौरी माने (वय ३०, रा. न-हे, आंबेगाव, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असा बहाणा करून फिर्यादी यांना त्यांचे चारचाकी वाहन मागितले. त्यामुळे फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपी माने यांना चारचाकी दिली. मात्र, आरोपी यांनी अपहार करण्याच्या उद्देशाने चारचाकी घेऊन गेले. सदरची चारचाकी परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












