न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी (दि. १०) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील कामकाज हे बेकायदा आहे. कोणत्याही विषयाला उपसूचना द्यायची झाल्यास ती उपसूचना ही विषय पत्रिकेवरील विषयाशी सुसंगत असावी लागते. कायद्यामध्ये त्याबाबत स्पष्टता आहे. मात्र, शुक्रवारच्या सभेत एकही उपसूचना विषयाशी सुसंगत अथवा तर्कसंगत नाही.
चुकीच्या पद्धतीने या उपसूचना देण्यात आल्या आहेत. सभाशास्त्र नियम व महाराष्ट्र महापालिका अधिनियमनुसार विषय व उपसूचना मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे सभेमध्ये जे विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आले आहेत. त्या विषयाची व उपसूचनांची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. सदरची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे, अशा आशयाचे निवेदन विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.
.












