न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गौरी राऊत (वय ११, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
तिच्या दोन्ही किडन्या निकामी होत्या तिच्यावर उपचार सुरू होते. यामुळे ती आपल्या शाळेपासून आणि मित्र-मैत्रिणींपासून दुरावली होती. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांना संशय आहे. याच दिशेने त्यांनी तपासही सुरु केला आहे.












