न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आज (सोमवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले.
या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी भाजपच्या आजारी मानसिकतेचा धिक्कार असो, ‘जाहीर निषेध, जाहीर निषेध’ असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते.
या आंदोलनात शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवराज कोकाटे, सरिता साने, नाना काळभोर आदी सहभागी झाले होते.















