न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०१९) :- “तुमचा आमचा जो पंगा आहे तो पक्ष म्हणून चालू द्या. थेट तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात. त्यामुळे महाराष्ट्रात भीषण स्थिती निर्माण झाली आहे”, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला.
ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला या भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी आहे, ते स्वस्थ बसणार नाहीत”. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, “गोयल हे काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यकर्ते आहेत. ते २५ वर्षे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना संजय राऊत यांनीच केली. ते चुकीचं मत आहे असं आमचं म्हणणं नाही” असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.












