- भोसरी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२०) :- मराठी माणसाच्या न्यायासाठी, हित-रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ८० टक्के समाजकारण हेच शिवसैनिकांचे मुख्य कार्य आहे. हेच बिद्र जोपासत, शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील, शिवसेना सह-संपर्कप्रमुख कामगार नेते इरफान सय्यद व शिवसेना महिला संघटीका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम आकुर्डीतील भारतीय कामगार सेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारतीय कामगार सेनेचे जेष्ठ उपाध्यक्ष मनोहर भिसे, भारतीय कामगार सेना महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आदी उपस्थित होते.
चिखलीतील जाणता राजा प्रतिष्ठान व मोरेवस्ती शिवसेना शाखा यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सह-संपर्कप्रमुख व कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय अल्हाट, समन्वयक सर्जेराव भोसले, विभागप्रमुख सतीश दिसले, आनंद हिंगे व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
च-होली येथे शिवसेना शाखा मार्गदर्शक व माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर, यूवा सेना अधिकारी कुणाल किसन महाराज तापकिर यांच्या वतीने “नेत्रदान करा मृत्यूनंतरही मृत्यूजंय बना” या संकल्पनेद्वारे नेत्र तपासणी व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी भोसरी विधानसभा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थिती होते.
आळंदी येथे “जिवन शिक्षण मंदीर प्राथमिक शाळा” येथील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपनेते मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा संघटीका सुलभा उबाळे, सहसंपर्कप्रमुख कामगार नेते इरफान सय्यद, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शहर महिला संघटिका आशा भालेकर, समन्वयक सर्जेराव भोसले, अनिल सोमवंशी व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थिती होते.
यावेळी इरफान सय्यद कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सुरुवातीच्या काळात शिवसेना नेतृत्वाचा चेहरा शहरी, सुशिक्षित, मध्यमवर्गीय असा होता. पुढे तो बदलत जाऊन, त्याला ग्रामीण बाज आला. सन १९८५ पर्यंत मुंबईपुरती मर्यादित असणारी शिवसेना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात का वाढली याचं उत्तर इथं मिळतं. महाराष्ट्राच्या राजकारणातलं बाळासाहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे, त्यांनी बहुजन समाजातील अनोळखी तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, समाजमान्यता मिळवून दिली. हातगाडी ओढणारे, पेंटिंग काम करणारे, अर्धशिक्षित, अल्पशिक्षित नगरसेवक बनले. काही आमदारही झाले. कामगार संघटना ही एक समाजातील शोषितांची चळवळ आहे. अर्थातच समाजातील शोषणाचा अंत करण्याचे ध्येय, ही तिची जन्मखूण आहे. कामगार संघटना ही कामगारास हक्क मिळवून देणारी, न्याय मिळवून देणारी संघटना आहे. याची जाणीव बाळासाहेबांना सुरुवातीपासूनच होती. यासाठी निष्ठावान, त्यागी, ध्येयवादी कार्यकर्त्यांची फौज उभी करून, त्यांना एका सामाजिक-राजकीय विचारांशी बाळासाहेबांनी जोडले. त्याचीच परिणीती म्हणजे पुढे जाऊ कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली. आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्वसामान्य कामगार भयमुक्त झाला आहे.


















