न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२०) :- नगर येथील रेसिडेन्सीअल हायस्कूलच्या मैदानावर २३ ते २५ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व नगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३१ व्या किशोर – किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह मधुकर नलावडे यांनी जाहीर केला. रहाटणीतील काळभैरनाथ कबड्डी संघातील महेश शिरसाठ, आर्यन राठोड यांची पुणे जिल्हा किशोर गट स्पर्धेत निवड झाली. या स्पर्धेसाठी किशोर गट मुलांच्या संघाचा संघनायक म्हणून वैभव राहुल वाघमारे, तर किशोर गट मुलींच्या संघाची संघनायका म्हणून सिध्दी दाते हे जबाबदारी सांभाळणार आहेत.
किशोर मुले संघ: राहुल वाघमारे (संघनायक), अजय गोफणे, वैभव मळेकर, ऋषी शर्मा, राहुल कळसे, महेश शिरसाठ, विक्रम परमार, विजय हेगडकर, भरत मोरे, आर्यन राठोड, यश बुट्टे, विशाल ताटे. राखीव: शुभम टेमगरे, राजू राठोड, साहिल धाडवे. संघव्यवस्थापक : पप्पू कंधारे, प्रशिक्षक : तुषार नागरगोजे.
किशोरी मुली संघ : सिध्दी दाते ( संघनायक ) , चांदणी गायकवाड , भूमिका गोरे , तनिष्का शिंदे , धनश्री पोकळघट , झुवेरिया पिंजारी , दिशांता भोसले , धनश्री तेली , स्वप्नाली जाधव , प्राची पवार , माहेश्वरी वाघ , प्रज्ञा कासार. राखीव : श्रीजना योगी, साक्षी रेणुसे, चतुर्थी म्हस्के. प्रशिक्षक : अजय जगताप.