- जादा पाणी मिळत नाही तोपर्यंत, एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरूच राहणार – महापालिका आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा असतानाही समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत महापालिकेने शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण अवलंबविले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.
याबाबतची मुदत शनिवारी (दि. २५) रोजी संपुष्टात आली. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा शहरवासियांना होती. मात्र महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी शहरवाशियांना सपशेल नाराज केले आहे. जोपर्यंत ३० एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी (दि. २७) रोजी सांगितले.















