न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- दोन अज्ञातांनी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाकड परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएममध्ये प्रवेश करताच चोरांनी सीसीटीव्हीची दिशा बदलली.
एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक भडका झाला आणि एटीममध्ये आगसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आगीत एटीएममधील आठ लाख रुपये जळून खाक झाले आहेत अशी माहिती संबंधित बँकेकडून देण्यात आली आहे.
ही घटना मध्यरात्री वाकड परिसरात घडली. संबंधित एटीएमम हे अॅक्सिस बँकेचे असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग मोठी असल्याने चोरांना इजा झाल्याची शक्यता वर्तवली जात असून दोघांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.
—












