न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- मोहननगर येथील श्री साईनाथ तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गणेश जयंती निमित्त मंडळाच्या वतीने श्रींची ढोलताशांच्या गजरात नगरप्रदशिना करण्यात आली.
यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई ने नटलेल्या सप्त अश्व रथातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच गणेश मंदिरात होमहवन, गणेश याग,गणेश जन्म सोहळा ,व महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
श्रींच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी परीसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश लंगोटे,उदय नामदे, प्रसाद हिरणवाळे,सचिन नामदे, सागर नामदे, शिवतेज चव्हाण, प्रसाद तारु,तुषार नामदे आदी कार्यकर्ते नी विशेष परिश्रम घेतले.


















