न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे आणि सेक्टर २३ निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक कामे करण्यात येणार आहेत.
त्याकरिता गुरुवारी (दि. ३०) पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होणार असून सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही.
शुक्रवारचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उलब्ध पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे .