न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ‘ ब व ह ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३१ व ३२ पिंपळे गुरव व नवी सांगवी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज बुधवारी (दि. २९) रोजी कारवाई केली.
या कारवाईमध्ये ६ आर. सी. सी., १ पत्राशेड, एकूण अंदाजे ६२७३.०० चौ. फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली. ही कारवाई सहशहर अभियंता राजन पाटील व बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ब व ह’ प्रभागाचे कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आली.
या कारवाईत १ उपअभियंता व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच मनपा पोलिस कर्मचारी व सांगवी पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्या सहाय्याने करणेत आली. कारवाई १ जेसीबी, १ डंपर, १ ब्रेकर तसेच १० मजुर सहभागी झाले, अशी माहिती बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ( ‘ ब ‘ ‘ ड ‘ व ‘ ह ‘ प्रभागचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.












