न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२०) :- शाळेत लंगडी खेळताना आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. ३०) सकाळी चिखली येथे घडली. अंकिता गजानंद डोणे (वय ८, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता ही चिखली येथील अभिनव विद्यालयात दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सकाळी अकराच्या सुमारास शाळेत पीटीच्या तासाला अंकिता व शाळेतील विद्यार्थी लंगडी खेळत होते. लंगडी खेळत असताना अंकिता अचानक जमिनीवर पडली. शिक्षकांनी अंकिताला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अंकिताचे वडील लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते मूळचे परळी वैजनाथ येथील आहेत.












