न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- शेतातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे गुरुवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली. संदीप आल्हाट ( ४३, रा. जुना आळंदी रोड, आल्हाट वस्ती, मोशी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
संदीपच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी संदीप हे सकाळी आठच्या सुमारास शेतात जाण्यासाठी निघाले. त्यांनी शेतात जाऊन देवाची पुजा केली. त्यानंतर मोबाईलवर देवाची गाणी लावली.
दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास संदीप यांचा भाऊ शेतात गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत संदीप यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.












