न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- निगडीच्या भक्ती शक्ती चौकाजवळ कंटेनर आणि दुचाकी चा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात रात्री झाला आहे असं पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, कंटेनर चालक फरार झाला असून देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सौदागर दशरथ लोंढे (वय-२७, ऐश) मोहम्मद खान (वय-२३) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर दत्तू कांबळे वय-२६ असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा भरधाव वेगात दुचाकी भक्ती शक्ती चौकाच्या दिशेने जात होती. तेव्हा, अचानक कंटेनर समोरून वळताना दिसला मात्र दुचाकी वरील नियंत्रण सुटून थेट चाकाखाली गेली यात दोघांच्या अंगावरून कंटेनर गेले असून एक जखमी झाला आहे. दरम्यान, कंटेनर चालक हा फरार झाला आहे अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली असून त्याचा शोध सुरू आहे.












