न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- डेटिंग वेबसाईटवर तरुणीचा मोबाइल क्रमांक कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. त्यामुळे संबंधित तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन व मेसेज आले. संत तुकारामनगर, पिंपरी येथे २ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय २२, रा. नारायणगाव, ता. जन्नर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी तरुणीचा मोबाइल क्रमांक आरोपी पानसरे याने एका डेटिंग वेबसाईटवर कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. त्यामुळे फियार्दी तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन कॉल्स येऊन हॉटसअप मेसेजेसही आले. त्यांनी याबाबत पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्जाव्दारे तक्रार केली. त्यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.












