न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना तसा फारसा दिलासा मिळालेले नाही. या अर्थसंकल्पात काही वस्तू महागल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत. स्वस्त झालेल्या वस्तूंमध्ये सामान्य व्यक्तीला दिलासा मिळेल असं काहीच नसल्याने सामान्यांची यातून मोठी निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली.
आज मोदी सरकारचा बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलं. या आजच्या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांची घोर निराशा करण्यात आली आज यांनी फक्त मोठमोठी भाषणं करीत, पुन्हा एकदा हवाई स्वप्ने दाखवण्याचे काम केलं. आजच्या बजेटमध्ये नुसत्या आकड्यांचा मायाजाल करीत गाव, गरीब, महिला, किसान आणि युवा रोजगार यांच्या सुरक्षेसाठी काहीही करण्यात आलेलं नाही.
पुन्हा एकदा या बजेटमधून गोरगरीब जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. यापुढे गोरगरीब जनतेला महागाईचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागेल, असेही सचिन चिखले यांनी म्हटले आहे.












