न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२०) :- सागर हा संत तुकाराम नगर येथील डी. वाय पाटील महाविद्यालयात बी कॉमच्या प्रथम वर्षात शिकत आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर फिर्यादी सागर आणि त्याचा मित्र गोविंद यादव असे दोघेजण दुचाकीवरून घराकडे जात होते.
ते संत तुकाराम नगर येथील साईबाबा मंदिरासमोर आले असता आरोपी आदित्य याने सागरची दुचाकी अडवली. सागर दुचाकीवरून खाली उतरला असता आरोपीने सागरला मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करत चाकूने त्याच्यावर वार केले. यामध्ये सागर गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना २७ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली. सागर दीपक गुप्ता (वय १८, रा. दर्गा वसाहत, गवळीवाडा, खडकी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य घाडगे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












