न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२०) :- भोसरी येथील गवळी माथ्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार करणारा आणि ज्याच्यावर गोळीबार झाला, असे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. हा प्रकार आज, मंगळवारी (दि. ४) सकाळी अकराच्या सुमारास झाला.
नाना लांडगे असे गोळीबार करणा-याचे नाव आहे. तर, प्रशांत लांडगे यांच्यावर गोळीबार झाला आहे. नाना आणि प्रशांत यांची जुनी भांडणे आहेत. सकाळी अकराच्या सुमारास भोसरीमधील गवळी माथा येथे नाना याने प्रशांत यांच्यावर गोळीबार केला.
सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.