न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- कँटीनमधून सँडविच चोरी केल्याच्या आरोपाखाली लंडनच्या सिटी बँकेतील भारतीय बँकर पारस शाह याचं निलंबन करण्यात आलं आहे. सँडविच चोरीच्या आरोपांनंतर बँकेने केलेल्या कठोर कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ३१ वर्षीय पारस शाह यांचे वार्षिक वेतन जवळपास नऊ कोटी २० लाख रुपये होते, अशी माहिती आहे.
लंडनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पारस शाह हे सिटी बँकेच्या लंडनमधील केनेरी व्हार्फ येथील मुख्यालयात कार्यरत होते. येथील कँटीन एखाद्या मोठ्या रेस्टॉरंट प्रमाणे आहे. युरोपातील सर्वात महागड्या क्रेडिट ट्रेडर्समध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता.















