न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- श्री शिव साई समर्थ संघाच्या वतीने सोमवारी (दि. ३) रोजी बोपोडीतील मानाजी बाग येथे श्री साई बाबांच्या पादुका दर्शन व भंडारा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यानिम्मित्त श्री साई बाबा, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री गजानन महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला. तसेच सत्यनारायण महापूजा, होमहवन, मध्यान्ह आरती, ललित सहस्त्रनाम पठण, स्तवन मंजिरी, भजन, धूप आरती व सायंकाळी ७-३० वा. साई बाबांचा भजनाचा व महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर हुतात्मा भाई कोतवाल यांचे भव्य प्रवेशद्वार उभारले होते. दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग त्याठिकाणी लागली होती. बाळासाहेब परदेशी यांच्या धार्मिक गीतांचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, विविध मंडळातील तसेच परिसरातील मोठा भक्त परिवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. भक्तांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री शिव साई समर्थ संघाचे पदाधिकारी व सभासद आणि साई भक्तांनी विशेष परिश्रम घेतले, अशी माहिती श्री शिव साई समर्थ संघाच्या वतीने देण्यात आली.















