न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी पोलिसांनी आरोपी नदीम याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार तोडमल, आदवडे आणि झगडे असे तिघेजण आरोपीला घेऊन बुधवारी दुपारी शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात पिंपरी येथे आले होते. त्यावेळी आरोपीचे नातेवाईक तिथे आले. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला.
पोलिसांच्या तपासात अडथळा आणून गोंधळ निर्माण केला. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी नदीम याने पोलिसांच्या तावडीतून सुटून धूम ठोकली. हा प्रकार बुधवारी (दि. ५) दुपारी दीडच्या सुमारास शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात पिंपरी येथे घडला. पोलिसांनी आरोपी नदीम गफूर शेख (वय १९) असे पोलिसांच्या हातून पळालेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्यासह सहारा नदीम शेख ( वय १९), गफूर जावेद शेख (वय ३२, सर्व रा. रिव्हर रोड, पिंपरी), आरोपीची मामे बहीण सुषमा राजू परदेशी (वय १८, शेवाळे सेंटर कंपनी आवार, पिंपरी) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
———