न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर धावत्या कारने पेट घेतला. ही घटना आज, गुरुवारी (दि. ६) दुपारी बाराच्या सुमारास वाकड जवळ घडली. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरून जात असताना धावत्या डस्टर कारने अचानक पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.