न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- आरोपी विजय फिर्यादी यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होता. त्याला फिर्यादी पानढवळे यांनी एक वर्षांपूर्वी घरातून काढून टाकले होते. त्याचा राग मनात धरून विजय त्याच्या चार साथीदारांना घेऊन मंगळवारी दुपारी पानढवळे यांच्या घरी आला. त्याने पानढवळे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या तीन दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्या.
पानढवळे यांनी विजयला अडवण्याचा प्रयत्न केला असता विजय आणि त्याच्या चार साथीदारांनी पानढवळे यांच्या गळयावर लोखंडी कोयता ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.
पानढवळे यांच्या शर्टच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर पानढवळे यांच्या मोठ्या भावाला व भाडेकरू सदाशिव हिरेमठ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी विजयला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.