न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रुवारी २०१९) :- पिंपरीतील डॉ .डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे (दि. ३० जानेवारी २०२० ते १३ फेब्रुवारी २०२०) दरम्यान ‘कुष्ठरोग निर्मूलन पंधरवाडा’ या निमित्त कुष्ठरोग निर्मूलन व जनजागृतीसाठी व्याख्यान व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सुपरवाईजरी अरबन लेप्रसी सेंटर पिंपरी यांच्यातर्फे रविशंकर विठ्ठल भरड ( कुष्ठरोग समुपदेशक ) यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, कुष्ठरोगाचा अधिशयन काळ, उपचार पद्धती, कुष्ठरोग कोणास होतो? त्याचप्रमाणे कुष्ठरोग्यांसाठी उपचारांपेक्षा समुपदेशन व हेल्थ एज्युकेशन हे महत्वाचे घटक आहेत, असे सांगितले. कुष्ठरोगावर प्रतिबंधक लस उपलब्ध नाही, कुष्ठरोग हा अल्पसांसर्गिक आहे, कुष्ठरोग हा १०० % बरा होऊ शकतो. कुष्ठरोग अनुवंशिक नसून, अधिशयन काळ हा रोग्यांसाठी मोठी समस्या आहे. अधिशयन काळ ६ महिने ते १० वर्षापर्यँत आहे. शासनाकडून रुग्णांना विविध सवलती देण्यात येतात व पुनर्वसनाची
व्यवस्था केली जाते. रुग्ण लवकर निदान होऊन उपचारांसाठी आल्यास रुग्णाला भविष्यात येणारी विकृती टाळता येते. एमडीटी उपचारासोबत आरोग्य शिक्षण, जनजागरण हे कुष्ठरोग्यांच्या बाबतीत महत्वाचे घटक आहेत. एम .डी. टी. (मल्टि ड्रग थेरपि) हा प्रभावी औषधोपचार शासनामार्फत मोफत दिला जातो, अशी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात कुष्ठरोग निर्मूलन या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ५१ सहभागी झाले होते. या कार्यक्रमास महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, प्राचार्य डॉ. जी. एच. येवला तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.