न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रुवारी २०१९) :- श्री क्षेत्र आळंदीत सद्गुरू जोग महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये १ लाख भाविक सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी अन्नदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. त्या आवाहनास चिखलीतील ग्रामस्थांनी साद दिली.
चिखलीगावच्या वतीने वारकऱ्यांसाठी दुपारच्या भोजनाकरीता १ लाख चपात्या देण्याचा संकल्प करण्यात आला. चिखलीतील कुदळवाडीमधील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात चपात्या बनवून त्या कुदळवाडीतील श्री विठ्ठल मंदिरात जमा केल्या. तसेच या चपात्या आळंदीतील जोग महाराज संस्थानकडे सुपुर्द करण्यात आल्या. याबद्दल संस्थानच्या वतीने कुदळवाडी ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला, अशी माहिती ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी दिली.