न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीतील तहसील कार्यालयातील फेरफार मशीन तब्बल ११ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना फेरफार काढण्यासाठी खडकमाळ येथील तहसील कार्यालयात जावे लागत आहे. त्याला वेळ लागत आहे.
या कार्यालयात एका व्यक्तीला दोन टोकन देण्यात येते. त्याकरिता तासन-तास रांगेमध्ये उभे रहावे लागते. तरीदेखील वेळेमध्ये सातबारा फेरफार भेटत नाही. त्याचा फायदा तेथील एजंट लोक घेतात. त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोजावे लागतात.
त्यामुळे आकुर्डीतील अप्पर तहसीलदार कार्यालयातील फेरफार मशीन तत्काळ चालू करावी अशी मागणी स्थायीचे अध्यक्ष मडिगेरी यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.