- शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- मध्यप्रदेशातील छिंदवाडामध्ये प्रशासनाने बुलडोझरने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान पुतळा बसवण्यापूर्वी कोणतीही आवश्यक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.