न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी येथे उघडकीस आली. अश्विनी जगदीश माने (वय ३५, रा. निर्जरा सोसा. रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माने कुटुंबीय हे मूळचे सांगली येथील असून ते मागील दोन वर्षांपासून रहाटणी येथे राहत आहेत. अश्विनी यांचे पती हडपसर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. जगदीश नेहमीप्रमाणे कामावर आणि मुलगा योगद्रुम पार्किंगमध्ये खेळत असताना अश्विनी यांनी गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.