न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) आपला मेकओव्हर केला असून पक्षाच्या अजेंड्याबरोबरच झेंडाही बदलला आहे. पक्षाच्या नव्या भगव्या झेंड्यावर मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारातील राजमुद्रेची प्रतिमा वापरली आहे.
यावर काही संघटनांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला कारणा दाखवा नोटीस पाठवली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मनसेला लिखित स्वरुपात ही नोटीस पाठवली असून यामध्ये त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीवरुन पक्षावर कारवाई का करु नये? याबाबत विचारले आहे. संभाजी ब्रिेगेड आणि मराठा महासंघाने याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या.