न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- निगडीतील नोव्हेल्स एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी च्या वतीने “व्हॅलेंटाइन डे” या दिवशी अनोखी संकल्पना राबविण्यात येते. “व्हॅलेंटाइन डे” हा दिवस नोव्हेल महाविद्यालय “लायब्ररी डे” म्हणून साजरा करते.
दरवर्षीप्रमाणेच उद्या शुक्रवारी (दि. १४) रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत गझलकार प्रदीप निफाडकर हे काव्यप्रवास व इतर अनुभव याविषयी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनात पुस्तकांविषयी प्रेमाची भावना निर्माण व्हावी व त्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचून समृध्द व्हावे ही या मागची भावना आहे. या कार्यक्रमात पुस्तक-प्रदर्शनासोबतच वेगवेगळया महाविद्यालयीन उपकमांमध्ये तसेच स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात येतो. शहरातील वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी व शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही गोरखे यांनी यावेळी केले.












1 Comments
priligy medicine
better business bureau online pharmacy priligy and, once under deep anesthesia, transcardially perfused with 15 ml of room temperature saline, followed by 15 ml of cold 4 paraformaldehyde PFA