न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- हॉली नान्सी या महिलेने 447510107011 या क्रमांकावरून फिर्यादी दत्तात्रय यांच्याशी फेसबुकवर मैत्री केली. हॉली नान्सी या महिलेने ती भारतात येत असून तिने एक लाख पौंड सोबत आणले आहेत. ते पैसे दत्तात्रय यांच्या खात्यावर पाठवायचे आहेत.
संगीता शर्मा या महिलेने कस्टमर ऑफिसर असल्याचे भासवून हॉली नान्सी या महिलेशी संगनमत करून एक लाख पौंड दत्तात्रय यांच्या खात्यात जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी ३४ लाख एक हजार ४५९ रुपये भरण्यास सांगितले. दत्तात्रय यांनी विविध खात्यांवर पैसे जमा केले. पैसे जमा करून एक लाख पौंड जमा न करता तसेच जमा केलेले पैसे न देता फसवणूक केली.
हा प्रकार ७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत थेरगाव येथे घडली. दत्तात्रय माधव शिंदे (वय ५८, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7088215230 क्रमांक धारक महिला नेहा शर्मा (रा. गुरगाव), निखिल शर्मा (पूर्ण नए पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.