न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवा रात्री पावणेबाराच्या सुमारास फुगेवाडीत येथे घडली. जीवन बालाजी कांबळे (वय ३०, रा. दापोडी. मूळ हाडोळी, ता. चाकूर, जि. लातर) मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार आर. डी. तापकीर यांनी फिर्याद दिली आहे. जीवन त्यांच्या दुचाकीवरून मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पुणे – मुंबई महामार्गावरून दापोडी येथून जात होते. जुना जकात नाका येथे वाहनाने त्यांच्या दुचाकी धडक दिली. त्यामध्ये जीवन गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.