न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके व लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळयास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सतिश भवाळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, युवराज दाखले, संजय ससाणे, आसाराम कसबे, विशाल कसबे, सुनिल भिसे, आशाताई शहाणे, मीना कांबळे आदी उपस्थित होते.















