न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- शुक्रवारी सकाळी सव्वा आठ ते शनिवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान फिर्यादी मुळीक यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून, लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील पाच तोळे ७०० मिलिग्रॅम वजनाचे एक लाख ७१ हजार रुपयांचे दागिने आणि नऊ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला.
तसेच फिर्यादी मुळीक यांच्या शेजारील फ्लॅटमध्ये राहणारे सुनील अशोक पवार यांच्याही घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आतील ३० हजार रुपये किंमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दोन्ही घटनांमध्ये एकूण दोन लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. १५) दुपारी पिंपरी गावातील वाघेरे कॉलनी येथे उघडकीस आली.
संदीप शंकर मुळीक (वय ३३, रा. स्टोनरीज सोसायटी, वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.