न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- युवा आविष्कार प्रतिष्ठाण व आई तुळजभवानी मंदिर ट्रस्ट व शिवनगरी बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनगरी बिजलीनगर येथे शिवजयंती निमिताने शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवरायांचे विचार आणि आचार घराघरात रुजण्यासाठी परिसरातील तरुणांच्या वतीने एकत्रितपणे हा शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. “रायबा….हेच का स्वराज्य?” ह्या महानाट्याने शिवमहोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमास घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील आणि प्रदीप माने यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, माउली सूर्यवंशी, सुनिल कदम व परिसरातील मोठा जनसमुदाय व शिवप्रेमींची उपस्थिती होती.
या प्रसंगी युवा अविष्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रज्योत धुमाळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज नुसतेच महाराष्ट्राचे दैवत नसून संपूर्ण विश्वाचे जननायक राजे आहेत. आज अनेक देशांच्या विद्यापीठांमध्ये राजांची युद्धनीती व सुराज्य नीती शिकविली जाते. अश्या आमच्या छत्रपतींच्या विचारांचे प्रबोधन घराघरात पोहचावे याकरिता या शिवमहोत्सवाचे शिवनगरीतील तरुणांनी एकत्रितपणे आयोजन केले.”
शिवमहोत्सव यशस्वी पार पाडण्याकरिता विशेष परिश्रम आशुतोष कातवरे, हृषीकेश उत्तेकर, अक्षय होले, शुभम जाधव, अजय नरबाडे, कल्पेश चौधरी, संकेत शेळके, अमोल सोनवणे, समीर दातार, रवी हेळवर, उमेश अहिरराव, लक्ष्मण रेड्डी, विजय जाधव, रोशन राणे, विनायक रेडकर, आकाश राठोड, उत्तम वाघमारे, चिदानंद कांबळे, अभिजीत भालेराव, आत्मज घोडगे, निलेश चौगुले, दत्ता होले, जीवन ढवण, अजय नवगिरे यांनी केले.












