न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२०) :- मावशीकडे राहण्यासाठी आलेल्या भाचीवर मावशीच्या नवऱ्याने लैंगिक अत्याचार केला. ही घटना निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत १६ वर्षीय मुलीने सोमवारी (दि. २४) पहाटे निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीसीएमसी कॉलनी, निगडी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय काकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ते २५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत फिर्यादी तरुणी आपल्या मावशीकडे राहण्यास आली होती. त्यावेळी मावशीचा नवरा आरोपी काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास आई, वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















