न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरू करण्यात आली आहे.
या पिंपरी-चिंचवड बससेवेचे तिकिट बुकिंग नागरिकांना, पर्यटकांना सुरळीतपणे करता यावे, यासाठी पीएमपीएलतर्फे ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. पीएमपीएलच्या pmpml.org या संकेतस्थळावर पर्यटक, नागरिकांनी तिकिट बुकिंग करावे आणि पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















