न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- “क” क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. २ मधील मौजे चिखली जाधववाडी येथे आज दि. २७/०२/२०२० रोजी महा नगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाने चिखली आकुर्डी रस्ता नाल्यानजीकच्या गट नं ८९१ येथील एकूण ११ अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर (क्षेत्रफळ अंदाजे ५६४५ चौ.फुट ) कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई सहशहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे अधिपत्याखाली ०२ उपअभियंता, ०२ कनिष्ठ अभियंता व ०९ बीट निरीक्षक यांनी केली.
ही कारवाई महापालिका अतिक्रमण पथकातील पोलिस उपनिरीक्षक ०१, पोलिस कर्मचारी ९, स्थानिक पोलिस, पोलीस कर्मचारी ०२, जे.सी.बी. ०१, मनपा मजूर ०८ यांचे उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती क, ई व फ क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.