न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- बॅंकेत ठेवलेल्या एक लाख ६० हजार रुपयांचा परस्पर अपहार करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत साहेबराव तेलंग (रा. मोरेश्वर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. २८) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी वसंत तेलंग आणि दत्तात्रय दिनकर आगरकर (वय ६२, रा. झुंजार गणपती जवळ, तानाजीनगर, चिंचवड) यांच्या खात्यातील प्रत्येकी ८० हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.












