न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये पिस्तूल खरी आहे की खोटी या गप्पांमध्ये चुकून झालेल्या गोळीबारात मित्राच्या खांद्याला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. यात आरोपीचा मित्र गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सन्नी परदेशी उर्फ रोकडे असे गोळीबार करणाऱ्या सराईत आरोपीचे नाव आहे. तो फरार असून, पिंपरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुरप्रित हरदेवसिंग असे जखमी मित्राचे नाव आहे. दोघेही गुन्हेगार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पिंपरीमधील डिलक्स चौकात आरोपी सन्नी परदेशी उर्फ रोकडे आणि त्याचे मित्र हे रिक्षामध्ये मद्यपान करत बसले होते. तेव्हा, आरोपी सन्नी याने पिस्तूल काढलं. पिस्तूल बघून ते खोटं असल्याचं गुरप्रित म्हणाला. यावर त्यांची चर्चा सुरू झाली.
ही चर्चा सुरू असताना अचानक पिस्तूलातून गोळी सुटली आणि थेट गुरप्रितच्या डाव्या खांद्याला लागली. ही सर्व घटना घडल्यानंतर आरोपी सन्नी परदेशी उर्फ रोकडे घाबरला. त्याने जखमी मित्राला तिथेच सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. त्यानंतर गुरप्रितनं दुसऱ्या मित्राला बोलावलं. त्याच्या मदतीनं गुरप्रित रुग्णालयात गेला. दरम्यान, फरार झालेल्या आरोपीचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत. आरोपी सन्नी याच्यावर पिंपरी पोलीस ठाणे आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल












