न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२०) :- चिखली गावचे ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते भिकाजी शिवराम नेवाळे (वय ९१) यांचे शुक्रवारी (दि २८) निधन झाले. एका खासगी कंपनीत नेवाळे यांनी २८ वर्षे नोकरी केली. त्यांचा चिखली पंचक्रोशीतील सामजिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.
नेवाळे यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व टाटा मोटर्स कंपनीतील कामगार नेते विष्णुपंत नेवाळे यांचे ते वडील होत.


















