न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२०) :- शरीरसुखाची मागणी करून कर्मचारी महिलेला फिरायला येण्यास सांगितले. तसेच कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून निगडी प्राधिकरण निगडी येथे ऑक्टोबर २०१९ ते जानेवारी विनयभंग केला.
प्राधिकरण निगडी येथे ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी ३१ वर्षीय कर्मचारी महिलेने शनिवारी ( दि . २९ ) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अभय नरवडेकर ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला प्राधिकरण निगडी येथील एका कंपनीतील कर्मचारी आहे. तर फिर्यादी महिला याच्याकडे कामाचे रिपोटींग करत. तू मला खूप आवडतेस, आपण दोघे फिरायला जाऊ, व शरीरसुखाची मागणी करीत असे. बाहेर फिरायला जाऊ, जेवण करू, असे म्हणून महिलेला त्रास देत असे. तसेच कामावरून काढून टाकण्याची महिलेला भिती दाखवित असे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












